19 वर्षीय तरुणीनं विकलं कौमार्य, मिळाले 19 कोटी रुपये!

अमेरिकेच्या एका मॉडेलने तब्बल 19 कोटी रुपयांना आपलं कौमार्य विकल्याचा दावा केला आहे. गिसेले असं या मॉडेलचं नाव आहे. आपल्या शिक्षणासाठी आणि जग फिरण्यासाठी आपण हा पैसा वापरणार असल्याचं गिसेलेनं सांगितलंय.

एका आंतरराष्ट्रीय जर्मन एस्कॉर्ट वेबसाईटवर तिने आपलं कौमार्य लिलाव करण्यासाठी ठेवलं होतं. अबूधाबीच्या एका अरबपतीने आणि एका हॉलिवू़डच्या स्टारने या तरुणीसाठी बोली लावली होती. मात्र हॉलिवूड स्टारवर मात करत अरबपतीने हा लिलाव जिंकला. त्याने 2.5 मिलियन युरोेमध्ये या मुलीचं कौमार्य खरेदी केलं. 

“कौमार्य विकण्याचा ट्रेंड म्हणजे स्वतःला स्वतंत्र करण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे सामाजिक अधिकार तर मिळतात शिवाय तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीही होता. जे लोक कौमार्य विकायला विरोध करतात त्यांचं मला आश्चर्य वाटतं. मी माझं कौमार्य कुणाला द्यायचं हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. बाकीच्यांना त्याचं काय करायचंय?”, असा सवाल या तीने विचारलाय.  

माझं कौमार्य इतकं महाग विकलं जाईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. ही खूप मोठी रक्कम आहे आणि आता मला माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, असं गिसेलेनं म्हटलंय. 

कौमार्य विकण्याची कल्पना माझी स्वतःची होती. व्यवहार पारदर्शक व्हावा आणि मिटिंग सुरक्षितरित्या पार पडाव्यात यासाठी आपण कौमार्य विकण्यासाठी जर्मन एस्कॉर्ट वेबसाईटचा आधार घेतला, असंही या तरुणीने सांगितलंय. 

दरम्यान, हा लिलाव पूर्ण करणाऱ्या वेबसाईटनेही या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसेच तरुणीला तिच्या कल्पनेपेक्षा जास्त रक्कम मिळू शकली याचा आम्हाला आनंद आहे, असं या वेबसाईटनं म्हटलंय. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता बाळगतो, असंही या वेबसाईटनं सांगितलंय.