विराट-अनुष्काचं लग्न अविस्मरणीय करणारे अदृश्य हात

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचं अवघ्या देशाला इतकं कवतीक की हा सोहळा संपन्न झाला तरी या विषयावरच्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. दोघांच्या लग्नाच्या रोज काहीना काही सुरस घटना-घडामोडी समोर येत आहेत. आता असेच काही फोटो आणि त्यांच्या मागची नावं समोर आली आहेत ज्यांनी हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला…

मावळत्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवत विराट आणि अनुष्का यांनी लगीनगाठ बांधली गेली आणि त्यांनी हळूच एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश केला. इटलीत मोठ्या गुप्ततेत हा सोहळा पार पडला खरा, मात्र या सोहळ्याचा थाट काही तुमच्या आमच्यापासून लपून राहिला नाही. उपस्थितांनी त्यांच्या कॅमेऱ्यात जे क्षण टिपले ते विराट-अनुष्कासाठी तर खासमखास आहेतच पण तुमच्या-आमच्याही दीर्घकाळ स्मरणात राहतील…

 

सिनेमांमध्ये मोठ्या धीरानं प्रसंगांना सामोरी जाणारी अनुष्का, भल्याभल्यांना लाजवेल असा अभिनय करण्यात प्रवीण, मात्र लग्नात हीच अनुष्का चांगलीच बावरुन गेलेली दिसली. वरचा व्हिडिओ पाहिला तर याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. तनू वेड्स मनू सिनेमात एक गाणं आहे, बावरी हो गई… तसंच काहीसं अनुष्काचं झालं असणार… (प्रत्यक्षात कंगणा बावरलेली नव्हती 😀 )

लग्न गुपचूप केलं पण दोघांचं अनाऊंसमेंट टायमिंग तुम्ही पाहिलंत का? एकाच वेळी सेम ट्विट फक्त फोटो वेगळे… चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच म्हणा की…. खालचे ट्विट्स पाहा… यामागे त्यांची सोशल मीडिया मॅनेजमेंट टीम नसेल, असं मानणं खुळचटपणाचं ठरेल… 😛

एवढा सगळा ताम-झाम पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक गोष्ट आल्यावाचून राहिली नसेल. कसलं मॅनेजमेंट असेल नाही हे लग्न उरकायला??? मॅनेजमेंट होतं, मात्र थोड्याच लोकांचं… कारण जिथं हे लग्न होतं तिथं मोजक्याच लोकांच्या राहण्याची व्यवस्था होती, खास दोस्तांना प्रवेश नव्हता, मात्र मॅनेजमेंटवाल्यांसाठी खास व्यवस्था होती . तसंही हे लोक नसते तर असे खासमखास व्हिडिओ आणि फोटो तुमच्या आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले नसते…

Image source

तर कोण होती ही माणसं?

लखनऊची देविका नारैला… लग्नात कार्यक्रमाची रुपरेषा आखणं जे असतं ना ते या मैत्रिणीनं सांभाळलं. तशी पाव्हण्यांची आपल्या लग्नात असते तशी गर्दी नव्हती म्हणा, मात्र या लग्नाकडे जगभरातील लाखो-करोडो लोकांचं लक्ष असल्यानं तसं हे काम नक्कीच वाटतं तितकं सोपं नव्हतं…

अशाप्रकारची कार्ये पार पाडण्याची देविकाची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी देविकाने क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा यांच्या लग्नाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलीय.

विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो पाहिले नसतील असा क्रिकेटवेडा किंवा सिनेमावेडा मनुष्य शोधून सापडणार नाही. कसले भन्नाट फोटो काढलेत ना???

जोसेफ राधिक… नाव या सगळ्या क्रिएटिव्हिटीमागचं नाव… जोसेफ तसा फोटोग्राफीतला अवलियाच आहे. तो सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहे, त्याला अनेक राष्ट्रीय तसेच आंतराराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.

एका लग्नाचे किती घेतो? असं विचाराल, तर ते बुवा नक्कीच आपल्या विचार करण्याच्या पलिकडचं असणार…. 😀

 

 

An honor and a privilege. To be here. To be a part of this occasion. To be trusted with this job. To be here with the woman I love (@naraindevika you made one of the most beautiful weddings I’ve ever seen!) and with the friends I share this passion with (@shivalichopra, @noeldavidraj and @theweddingfilmer). But most importantly, to work with people who make our job look so easy. These two will be among the most fun and in love couples I’ve ever photographed and this wedding was a surreal combination of luxury, simplicity, intimacy, and love. So much of it. I have so much to say, but I have to go shoot the last event now. Thank you, my Instagram family for all the love. Big hugs. #chasinglight #travel #sonyalpha #travelgram #ohtheplacesiveseen #weddedwonderland #wedphotoinspiration #instalove #instawedding #love #bride #indianbride #bigfatindianwedding

A post shared by Joseph Radhik (@josephradhik) on

 

A learning. That’s what this entire week has been. A simple comment by me on an Instagram photo got the media blowing things out of proportion as a “tiff” between me and Sabyasachi. Firstly, a big shoutout to @sabyasachiofficial for providing us (@storiesbyjosephradhik) image credits beautifully on every image and doing so in such short time! Thank you! Next and finally, we’ve been truly blessed to be a part of this magical celebration of love in Tuscany over this weekend. At this moment, everyone who made the wedding look so beautiful and timeless should be proud of themselves and also grinning from ear to ear seeing how happy the bride and groom were at the event. Our images wouldn’t look the way they do if it weren’t for the design genius of @sabyasachiofficial, the creativity of a @naraindevika, the makeup and hair by @puneetbsaini & @georgiougabriel, the styling of @alliaalrufai, the hard work and inputs of Ritika and Manav, being coordinated with @theweddingfilmer and finally the planning of @shaadisquad. So here’s to being a little part of the wedding of the decade. Thank you Virat and Anushka, here’s to you! #countyourblessings #virushka PS: Uhh, I shot this with a Sony A9 and reflected the ceiling with my cellphone. Fun fact: the structure you see here is a temporary heated glass house. How cool is that!

A post shared by Joseph Radhik (@josephradhik) on

विराट-अनुष्काच्या कपड्यावर नजर टाकली तर अनुष्काच्या फिकट गुलाबी लेहंग्यावर तुमची नजर खिळून नक्कीच राहिली असेल. अनेक मुलींनी तर हे मनाशी ठरवलं असेल की लग्नात लेहेंगा घालेल तर असाच नाहीतर नाही. 😉

गमतीचा भाग सोडा पण हा लेहेंगा तुम्हाला आवडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो हा लेहेंगा कुठे मिळेल. हा लेहेंगा मिळेल कोलकात्याच्या सब्यसची मुखर्जी यांच्याकडे… फक्त अनुष्काच नव्हे तर विराटचे कपडेही त्यांनीच डिझाईन केलेत…

 

अनुष्का तिच्या लेहेंग्यामुळेच सुंदर दिसतेय, असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा… एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसणाऱ्या अनुष्काच्या सौदर्यामध्ये तिच्या मेकअप आणि हेअरस्टाईलचं तेवढंच योगदान आहे. पुनीत सैनीनं तिचा मेकअप केलाय तर ग्राबियल जॉर्जूने तिच्या केसांवर कष्ट घेतलेत.

Image Source

 

नवरा येतो नवरीसाठी आणि वऱ्हाड येतं जेवणासाठी, अशी एक म्हण गावाकडे प्रचलित आहे. लग्नात मेन्यू काय आहे? याकडे अनेक पाव्हण्यांचं लक्ष असतं. लग्नघरचेही लोक जेवण लज्जतदार होईल याची काळजी घेतात. विराट-अनुष्काच्या लग्नात ही काळजी घेतली गेली नसेल तरच नवल.. 

Image Source

सुप्रसिद्ध शेफ रितू दालमिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पाव्हणे तसे इनमीन होते, मात्र लग्न मोठ्या घरचं म्हटल्यावर जिभेचे चोचलेही तसेच असणार की… इंडियन-इटालियन मिक्स, पोर्चिनी मश्रूम, बिकानेरी रोटी, पनीर कुर्चान असे काही मेन्यू होते म्हणतात. आता खाणारांना माहीत आणखी काय-काय होतं… 😛

 

तर एकूण अशा थाटात हे लग्न पार पडलं. गुपचूप सुरु असलेलं प्रेमप्रकरण लग्नाच्या गाठीत बांधलं गेलं. आता दोघं खऱ्या अर्थानं त्यांच्या संसारिक जीवनाला सुरुवात करतील. तुमच्या आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेतच… दोघांच्या प्रेमाची ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हावी एवढीच काय ती इच्छा…