कसब्यात लगीनघाई, पाहा कोण होणार बापटांची सून!

भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सुपूत्र गौरव बापट लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. सांगलीतील स्वरदा केळकर यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडाही पार पडला आहे. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये या लग्नाचा स्वागत समारंभही पार पडणार आहे.

कोण आहेत स्वरदा केळकर?

-स्वरदा केळकर या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान भाजप नगरसेविका आहेत.

-त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच राज्य सरकारने बाल हक्क आयोगावरही त्यांची नेमणूक केलीय.

-भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत.  

आई नीता केळकर यांच्यासोबत स्वरदा

स्वरदा आणि गौरव यांचं लव्ह की अरेंज मॅरेज?

स्वरदा केळकर यांंनी एलएलबीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. पुण्याच्या डीईएस लॉ कॉलेजध्ये त्या शिक्षणासाठी होत्या. याच कॉलेजमध्ये गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरवही शिक्षण घेत होते. कॉलेजला प्रवेश घेतल्यापासून दोघे एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही कुटुंबं राजकीय पार्श्वभूमी असलेली आहेत, शिवाय एकाच पक्षाशी बांधिलकी असलेली आहेत. त्यामुळे घरच्यांनीही त्यांच्या या विवाहाला पाठिंबा दिला.

स्वरदा केळकर यांच्याविषयी…

स्वरदा यांच्या आई नीता केळकर राज्य भाजपच्या उपाध्यक्ष आहेत. त्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे वारसाहक्काप्रमाणे हा आक्रमकपणा स्वरदा यांच्या अंगातही उतरला. तरुण वयातच त्यांनी रस्त्यांवरच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. भाजपमधील अनेक मोठे नेते घरी ये-जा करत होते, त्यामुळे त्यांची पाठीवर कौतुकाची थाप पाठीवर पडत होती आणि तीच थाप त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरत होती.

थोड्याच कालावधीत भाजपच्या तरुण फळीतील आक्रमक चेहरा, अशी त्यांची ओळख झाली. त्यामुळे स्वरदा या गिरीश बापट यांची सून म्हणून येणं त्यांच्या विरोधकांच्या चिंतेत वाढ करणारं आहे. खालील फोटोमध्ये एवढ्या मोठेला संबोधित करणं त्यांच्या नेतृत्वगुणांची चांगलीच प्रचिती देतं…

स्वरदा यांचं कायद्याचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे कायद्यातील खाचाखोचा त्यांना माहीत आहेत. त्यांनी अनेक परदेशी सेमिनार्समध्ये भाजप तसेच देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बाल हक्क आयोगाच्या मार्फत त्या करत असलेलं कामही आश्वासक आहे. 

मातब्बर राजकारण्यांचं मार्गदर्शन-

स्वरदा केळकर यांना लहानपणापासून त्यांच्या आईंचं मार्गदर्शन लाभलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कायमच स्वरदा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतात. पंकजा मुंडे यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशीही स्वरदा यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद, त्यात राज्याच्या विद्यमान मंत्र्यांची सून यामुळे स्वरदा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच बहरण्याची शक्यता आहे. 

गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल स्वरदा यांनी फेसबुकवर व्यक्त केलेल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वरदा यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट- 

अमित शहांना भेटल्यानंतर स्वरदा केळकर यांची पोस्ट-

लग्नाविषयी स्वरदा आणि गौरव काय म्हणाले?

आई आणि गौरवच्या वडिलांची ओळख आधीपासूनच होती. आता ही ओळख नातेसंबंधांमध्ये रुपांतरीत होत आहे याचा आनंद आहे, अशा भावना स्वरदा यांनी साखरपुड्यावेळी व्यक्त केल्या. 

दोघांच्याही घरच्या मंडळींची लग्नाला पसंती होती. स्वरदा आणि मी एकच कॉलेजला प्रवेश घेतला होता. प्रवेश घेण्याआधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कॉलेजला एकत्र असताना एकमेकांच्या प्रेमात पडलो, आमचं लग्न होतंय याचा आनंद आहे, असं गौरव बापट यांनी साखरपुड्यावेळी सांगितलं.

व्हाईट हाऊसबाहेर स्वरदा केळकर

कसबा पेठे मतदारसंघाची नवी उमेदवार? 

स्वरदा सांगली महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून सध्या राजकारणात सक्रीय आहेत. सध्या त्या सांगलीच्या वॉर्ड क्रमांक 36 मधून नगरसेविका आहे. मात्र पुढील निवडणूक त्या तिथून लढवणार नसल्याचं कळतंय. अर्थातच त्या पुण्याच्या सूनबाई होणार आहेत त्यामुळे त्या पुण्यातून नशिब आजमावतील. एवढ्या आक्रमक सूनबाईंच्या येण्याने गिरीश बापट यांची ताकद नक्कीच वाढणार आहे, मात्र त्यांच्या विरोधकांसाठी मात्र पळता भुई थोडी होण्याची शक्यता आहे…

एका कार्यक्रमाप्रसंगी स्वरदा केळकर आणि गिरीश बापट