प्रिया प्रकाशपेक्षा कातील अदा, नवोदित मराठी अभिनेत्रीची एकच चर्चा!

प्रिया प्रकाश हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीला माहित झालं आहे. नवोदित अभिनेत्री असलेल्या प्रियाचे आगामी सिनेमातील डोळा मारण्याचे एक्स्प्रेशन तरुणाईला चांगलेच भुरळ घालताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या प्रिया प्रकाश या एकाच नावाची चर्चा आहे. 

प्रिया प्रकाशचे एक्स्प्रेशन व्हायरल होण्याआधी महाराष्ट्रातील एका नवोदित मराठी अभिनेत्रीचे एक्स्प्रेशनही चांगलेच व्हायरल झाले होते. प्रियाच्या तोडीस तोड एक्स्प्रेशन असूनही तिला मात्र प्रियाएवढी लोकप्रियता नक्कीच मिळाली नाही. त्या मराठी नवोदित अभिनेत्रीचं नाव आहे शिल्पा ठाकरे…

सोशल मीडिया चांगल्या प्रकारे अॅक्टिव्ह असणाऱ्या प्रत्येकाला शिल्पा ठाकरे हे नाव कदाचित माहित असेल. नाव माहीत नसेल तर तिचा एखादा व्हिडिओही तुम्ही नक्कीच पाहिला असले. “इचार काय हाय तुमचा” या गाण्यावरील तिच्या अदांनी भल्याभल्यांना चांगलंच वेडं बनवलं होतं. सध्या प्रिया प्रकाशची चर्चा होत असल्यानं मराठमोळी शिल्पा ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

शिल्पाची अधिक माहिती वाचण्यापूर्वी तिने नुकताच सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडिओ पाहा… 

 

“नाही घरात कोण, म्हणून केलाय फोन…”वरील तिच्या अदा केवळ अप्रतिमच नव्हे तर प्रेमात पाडणाऱ्या आहेत. प्रिया प्रकाशपेक्षा तुम्हाला शिल्पा ठाकरे जास्त भावली तर आश्चर्य वाटायला नको. तर अदाकारी क्वीन शिल्पा ठाकरे नेमकी आहे कोण???

-शिल्पा ठाकरे मूळची नागपूरची आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1992 रोजी झाला.

-नागपूरच्या एमकेव्ही स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालंय. 

-मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करण्याचं काम शिल्पा ठाकरे करते.

-प्रेमा, भिरकीट, आलंया माझ्या राशीला, यारी दोस्ती-2 अशी काही तिच्या सिनेमांची नावं आहेत.

-काही वेब सिरीजमध्ये सुद्धा अभिनय करण्याचं काम शिल्पा ठाकरे करते.

-अभिनयासोबतच शिल्पा एक चांगली डान्सर आणि लेखिकाही आहे. सिनेमांचं सहलेखन करण्याचं कामही ती करते.

-शिल्पा ठाकरेच्या अदा यूट्यूबवर फारच फेमस आहेत. तिच्या अदांना यूट्यूबवर लाखो लाईक्स आहेत. 

-व्हॉट्सअॅपवर ठेवल्या जाणाऱ्या स्टेटसमध्ये शिल्पा ठाकरेचा चांगलाच डंका आहे. अनेकांच्या स्टेटसवर शिल्पाच्या अदा दिसल्यास नवल वाटायला नको.

शिल्पाच्या सर्व अदा एकत्रित केलेला असाच एक व्हिडिओ-

एक नवोदित मल्याळम अभिनेत्री आपल्या अदाकारीमुळे 24 तासात जगभरात हीट होते. मात्र तिच्यापेक्षा सरस असलेली नवोदित मराठी अभिनेत्री मात्र दुर्लक्षित राहते. शिल्पाला अभिनयाचं जे वरदान मिळालं आहे त्यामुळे ती नक्कीच प्रगती करत राहील मात्र तिला मराठी माणसांना सपोर्ट मिळण्याची गरज आहे. शिल्पाला साथ देण्यासाठी ही पोस्ट शेअर करा…