विश्वास नांगरे-पाटलांनी जे केलं त्यावर तरुणांचा विश्वासच बसला नाही!

आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरीला गेलो होतो… आजकाल सुरक्षेच्या कारणास्तव पायथ्याला असलेल्या दत्त मंदिरापासून गाड्या वर जाऊ देत नाहीत…

मी आणि सोहम दत्त मंदिराजवळ काही जणांची वाट पहात थांबलो होतो. तेवढयात एक इनोव्हा वेगात गेली… आतमध्ये विश्वास नांगरे-पाटील बसल्याचे दिसले… त्यानंतर जुन्नर परिसरातील एक दोन राजकीय नेत्यांची टोळकी चालत पुढे गेली…

काही वेळानंतर मी आणि सोहमही चालत निघालो… किल्ल्याला वर जायला पायऱ्या असल्या तरी बऱ्यापैकी चढण आहे… वर जायला साधारण एक तास लागतो… आम्ही वर जात असताना आमच्या पुढे गेलेली टोळकी मध्ये आराम करताना बसलेली दिसली…

आराम करणाऱ्या टोळक्याला मागे टाकून आम्ही पुढे जात राहिलो… विश्वास नांगरे-पाटील मात्र आम्हाला शेवटपर्यंत दिसले नाहीत… मी आणि सोहम चालता-चालता ह्या माणसाचा फिटनेस किती भारी असेल याची चर्चा करतच वर पोहोचलो. तोपर्यंत नांगरे-पाटलांनी मुखमंत्र्यांसमवेत शिवरायांच्या जन्मस्थळाकडे कूच केली होती..

-आदित्य गुंड ( लेखक एमएनसीमध्ये कामाला आहेत. )