का होतोय हा फोटो व्हायरल? काय आहे यामागचं रहस्य???

काल दुपारपासून या फोटोनं सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. एक ओळीचं कॅप्शन आणि त्यासोबत हा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून अनेकजण अशा प्रकारच्या पोस्ट शेअरही करत आहेत. मात्र नेमके काय संदर्भ आहेत या फोटोला ज्यामुळे हा फोटो शेअर झाला?

-पुण्याच्या बीएमसीसी मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली.

-शरद पवार यांच्या या मुलाखतीनंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या

-काही प्रतिक्रिया मुलाखत कशी चांगली होती हे सांगणाऱ्या होत्या तर काही मुलाखत जेमतेम किंवा बोगस होती हे सांगणाऱ्या होत्या.

-एवढे दोन दिग्गज नेते मुलाखतीच्या निमित्ताने एकत्र येते म्हणजे राजकीय क्षेत्रातही चर्चा होणारच

-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी जेव्हा या मुलाखतीबाबत छेडलं तेव्हा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला

-1993 च्या दंगलीप्रकरणी 2000 साली वयाच्या 70 व्या वर्षी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कुणी तो कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही, असं टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर सोडलं.

– मी चोरुन ही मुलाखत पाहिली नाही, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनाविरोधी गटांनी हे छायाचित्र व्हायरल केलं

-शिवसेना म्हटलं की वाघ आला आणि हाच वाघ झाडाआडून चोरुन पाहतोय. अर्थात मुलाखत पाहतोय, असा संदर्भ या फोटोला देण्यात आला.

-सोशल मीडियावर अनेकांनी हा फोटो शेअर केला होता. सोबत लिहिलं होतं, “वाघ चोरुन मुलाखत पाहताना”

-या फोटोची सोशल मीडियावर अनेकजण मजा घेताना दिसत आहे तर अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली देखील उडवली आहे.

-उद्धव ठाकरे यांनी मुलाखत पाहिलीच नाही तर ते यावर एवढे भरभरुन बोललेच कसे? असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे. 

 

( आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला खालील कमेंटमध्ये सांगा. ही बातमी शेअर करायला विसरु नका )