….म्हणून जान्हवीनं श्रीदेवींसोबत ३ दिवस बोलणं टाळलं होतं!

बॉलीवूडची फर्स्ट लेडी सुपरस्टार श्रीदेवी एक उत्कृष्ट कलाकार होत्या. त्यांची मुलगी जान्हवीच्या एका कृतीतून ही गोष्ट आणखी स्पष्ट होतं. सदमा सिनेमा आल्यानंतर श्रीदेवी यांना हा अनुभव आला होता. 

जान्हवी तेव्हा अवघ्या ६ वर्षांची होती. सदमा सिनेमा पाहिल्यानंतर तीने आपल्या आईशी बोलणं बंद केलं होतं. तब्बल ३ दिवस ती श्रीदेवी यांच्यासोबत बोलत नव्हती. श्रीदेवींना याचं खूप दुःख झालं, मात्र कारण कळाल्यानंतर त्यांना हसूही आलं.

कमल हसनसोबत ‘सदमा’ चित्रपटात श्रीदेवी यांनी मानसिक आघात झालेल्या एका तरुणीची भूमिका साकारली होती. श्रीदेवींची मुलगी जान्हवीने हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर ती आईला म्हणाली, “तू एक वाईट आई आहेस. तू त्याच्या (कमल हासन) सोबत चांगलं नाही केलंस.” श्रीदेवीचा ‘मॉम’ नावाचा सिनेमा आला होता, त्या सिनेमाच्या प्रमोशनवेळी श्रीदेवी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला हा किस्सा सांगितला होता.

खरंतर श्रीदेवी यांच्यासाठी त्यांच्या अभिनयासंदर्भात एक प्रतिक्रियाच होती, किती जिवंत अभिनय होता जो त्यांच्या मुलीलाही खटकला होता. 

श्रीदेवी या सिनेमाबद्दल बोलताना सांगतात, की ‘सदमा’त साकारलेली व्यक्तिरेखा आपल्या कारकीर्दीतील सर्वात संवेदनशील भूमिका असल्याचं मला मान्य नाही. ‘एका लहान मुलीसारखी ती व्यक्तिरेखा होती, तर उलट कमल हासन यांची भूमिका अत्यंत इंटेन्स होती.