श्रीदेवी यांचा जन्म कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या घरी झाला, वाचा पुढे…

फोटो- राष्ट्रीय फिल्म संग्रहालय

श्रीदेवी यांचा जन्म अल्पभूधारक कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या घरी झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचं कुटुंब आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत होतं. त्यांनी कधीकधी धुणीभांडी करत कधी खुरपायला जात, जिल्हापरिषदेच्या आपल्या बोंदरवाडी गावात शिक्षण पूर्ण केलं. घरून विरोध होता परंतु त्यांनी परत जिद्दीच्या जोरावर उच्चशिक्षण घेतलं. वडलांनी नंतर त्यांना सपोर्ट केला.

कधी गारपीठ, कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ असतानाही त्यांनी काही पैसै साचवले. देवी यांनी त्यातूनच कथ्थक आणि भरतनाट्यमवर पकड बनवली. त्या मोठ्या स्टार झाल्या. महिला आणि बालकल्याण विभागानं त्यांना विशेष पुरस्कार दिला. त्या हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवू लागल्या.
दरम्यान मराठवाड्यात साहेबांनी पाण्याच्या अनुशेषचा प्रश्न मिटवला. जायकवाडीच्या वरच्या भागातल्या साखर कारखान्यांना थोडं समजावून सांगितलं. मराठवाड्यात पाणी आलं. 
शेतीची भरभरभराट झाली. श्रीदेवी यांनी मराठवाड्यात जमिन घेऊन ती कसायला सुरवात केली. मग त्यांना वाटलं शेतीसाठी काहीतरी करायला हवं. महिलांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांनी महिला बचतगटाची आयडिया काढली. महिला बचत गटांतून गुळनिर्मिती केली. त्यांनी हिमोग्लोबीन वाढवा म्हणून लोणावळ्याच्या चिक्कीचा प्लन्ट टाकला. आणि महिलांचा विकास करण्यासंबंधी बरेच राष्ट्रीय योगदान दिले.

एक सेलिब्रीटी शेती करू लागल्यामुळे मिडीयालाही शेतीचे प्रश्न अचानक कळू लागले. मिडीयाने शेतीप्रश्नावर दिर्घ रिपोर्ताज केले. शोध पत्रकारितेने तर धडाकाचं लावला. एका कापूस उत्पादक अल्पभूधारक खंगलेल्या शेतकऱ्याच्या घरात असा रत्न जन्माला आला. त्यानं वैचारिक– सामाजिक– शेती – सांस्कृतिक क्षेत्र ढवळून काढलं. 
त्यांनी आदिवासी महिलांच्या केलेल्या भूमिकांसाठी अॉस्कर मिळवून देशाचा मान वाढवला. पण आपल्या देशातील आदिवांसीची स्थिती बाहेर कळाली म्हणून अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांनी विरोधही केला होता. 
पंरतु या आदिवासी भूमिका जगभरात गाजल्या आणि देशाविषयी बाहेरील लोकांना कळवळा वाटला. त्यामुळे बहोतसारी फॉरेन फंडींग एनजीओला मिळायला लागली.

त्या आपल्या शेतात कधीकधी हौसेने उसकापनी करायच्या. आज पहाटे अचानक उस कापनी करताना त्यांना एक उसाचं तेजतर्रा पातं येऊन गळ्याला घासलं आणि त्यांचा दुखद्द मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने देशच ढवळून निघाला.
असंख्य फेसबुक पोस्टी, ट्विटरवर त्यांना आदरांजली देण्यात आली. त्यांच्या या गुढ मृत्यूमुळे उसतोडणी संदर्भात अनेक प्रश्न उभे राहिले. मिडीयाने उसतोडणी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आणला.

कलेच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय आहेच पण महिला धोरण, कृषी, सिंचन, आदिवासी विकास या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल आपन सैदवी त्यांचं रूणी राहिलं पाहिजे. 
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जाणाऱ्या दिपीका पदुकोण यांना आपन सर्वांनी प्रोहत्सान दिलं पाहिजे.

ता.क विचारवंतांसाठी– सदरील पोस्ट श्रीदेवी या ‘व्यक्तीविषयी’ नसून श्रीदेवी नामक ‘मिथकाच्या मृत्यू सोहळ्याची’ आहे. कृपया संवेदनशील नागरिकांनो झांजा नको.

 

-कुणाल गायकवाड ( लेखक मिथकांचे आणि भाषेचे अभ्यासक आहेत. )

( लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. संपादक/मालक या मतांशी सहमत असतीलच असं नाही. )