श्रीदेवीनं केलेला शेवटचा डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक अभिनेते-अभिनेत्रींसह तिच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. काही तासांपूर्वी भाच्याच्या लग्नात मिरवणारी आपली आवडती अभिनेत्री अशी एकाकी जग सोडून जाते यावर अनेकांचा विश्वास बसलेला नाहीये. 

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये श्रीदेवी आपले पती बोनी कपूर यांच्यासह डान्स करताना दिसत आहे. भाचा मोहीत मारवाह या विवाहातील हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय.

दरम्यान, याच विवाहसोहळ्यातील श्रीदेवीची एन्ट्रीही व्हायरल झाली आहे. 

दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर श्रीदेवी यांचं अचानक जाण्यावर विश्वास ठेवू शकणार नाही.