श्रीदेवीच्या आयुष्यातील शेवटची 30 मिनिटं, हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

तब्बल 5 दशकं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीदेवी यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे. त्यांच्या आयुष्यातील हेच क्षण आता समोर आले आहेत. यूएईचं वर्तमानपत्र खलीज टाईम्सने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केलं आहे.

काय म्हटलंय खलीज टाईम्सच्या वृत्तात?

-बोनी कपूर आपल्या पत्नीला सरप्राईज डीनरला घेऊन जाऊ इच्छीत होते. यावेळी तयार होताना श्रीदेवी बाथ टबमध्ये बेशुद्ध पडल्या होत्या, असा दावा खलीज टाईम्सच्या वृत्तात करण्यात आलाय.

-शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईहून जुमैरा एमीरैट्स टॉवर्स हॉटेलमध्ये परतले

-बोनी कपूर यांनी श्रीदेवींना झोपेतून उठवलं. त्यांच्यासोबत 15 मिनिटं गप्पा मारल्या

-आपण तुला सरप्राईज डीनरला नेऊ इच्छितो, असं त्यांनी श्रीदेवींना सांगितलं.

-बोनी कपूरची निमंत्रण मान्य करत श्रीदेवींनी तयार होण्यास सुरुवात केली

-श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्यानंतर बोनी कपूर त्यांची वाट पाहात होते, मात्र तब्बल 15 मिनिटं झाली तरी त्या बाहेर न आल्यानं बोनी कपूर अस्वस्थ झाले

-बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना वॉशरुम बाहेरुन हाका मारल्या मात्र त्यांचं उत्तर आलं नाही. दरवाजा वाजवला तरी कोणताही प्रतिसाद नव्हता

-अस्वस्थ झालेल्या बोनी कपूर यांनी धक्के मारुन दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून त्यांचं शरीर थिजलं.

-वॉशरुममधील बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या उठल्या नाहीत.

-बोनी कपूर यांनी लगेचच आपल्या मित्राला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानं पोलिसांना फोन केला.

-पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्रीदेवींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.