स्लीम-ट्रीम, सुडौल आणि देखणं दिसण्याच्या स्पर्धेचा बळी???

श्रीदेवी…  सिनेजगतातलं असं नाव जिच्या एका अदाकारीनं भलेभले घायाळ होत, सौदर्य असं की त्याची स्तुतीच करणं अशक्य. सौंदर्य शाप असतो असं म्हणतात. श्रीदेवीच्या बाबतही तेच झालं का? तिच्या अकाली जाण्यानं सिनेसृष्टीला धक्का तर बसलाच, मात्र सिनेजगातत एक अदृश्य भीतीचं वातावरण पसरलं आहे. चांगला माणूस असा एकाकी कसा आपल्यातून निघून जाऊ शकतो? श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणांची आता मीमांसा होऊ लागलीय. खरी कारणं जसजशी बाहेर येत आहेत, तसतशी सिनेजगताची भीती वाढत आहे. सिनेजगतातील टोकाच्या स्पर्धेनं आणि सुंदर दिसण्याच्या अट्टाहासाने श्रीदेवीचा बळी घेतल्याचं बोललं जातंय.

नेमका कशामुळे झाला श्रीदेवीचा मृत्यू?

-बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला हे कारण आता समोर आलं आहे. मात्र हे तत्कालीक कारण आहे. श्रीदेवी नशेत होती, तिच्या रक्तात दारुचा अंश आढळला, असा दावाही गल्फ न्यूजनं केलाय. त्यामुळे नशेत असल्यामुळे पाय घसरुन टबमध्ये पडली असावी आणि त्यानंतर कार्टियक अरेस्ट आला असावा किंवा कार्डियक अरेस्ट आल्यामुळे श्रीदेवी बाथटबमध्ये पडली असावी अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. 

हे तत्कालीक कारण झालं. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूच्या 3 शक्यतांची सध्या सिनेसृष्टीत चर्चा आहे…

पहिली शक्यता-

सिनेसृष्टीत रहायचं असेल तर आता वजनावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं होऊन बसलं आहे. वजन जास्त झालं की ती व्यक्ती आपोआप या जगतातून बाहेर फेकली जाते. ती दुर्लक्षित बनते. श्रीदेवीसारख्या एकेकाळच्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या हे पचनी पडणं शक्य नव्हतं, त्यामुळे ती वजन ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिला त्यात यशही आलं होतं. मात्र हेच यश तिच्यासाठी जीवघेणं ठरल्याचं बोललं जातंय. काही न्यूज वेबसाईट्सच्या मते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी श्रीदेवी काही औषधांचं सेवन करत होती. याच औषधांनी तिचा घात केल्याची शक्यता आहे.

दुसरी शक्यता- 

वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच सेपमध्ये राहणं अभिनेत्रींसाठी तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. श्रीदेवीने त्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं होतं, असं कळतंय. त्यामुळे शरीराला जे आवश्यक घटक असतात त्यांची मात्रा घटत गेली. त्याचा परिणाम तिच्या शरीरावर नक्कीच झाला असणार

तिसरी शक्यता-

वजन आणि सुडौल बांध्यासोबतच तुमचा चेहरा हा सिनेजगतात महत्त्वाचा मानला जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की संबंधित अभिनेता किंवा अभिनेत्रींचा प्रवास संपतो. त्यामुळे काळानूसार काही अभिनेते-अभिनेत्री आपल्या चेहऱ्यात बदल करुन घेतात. कोणी नाकावर सर्जरी करतं तर कोणी ओठांवर… श्रीदेवीनं आपल्या नाकावर सर्जरी केल्याचं वृत्त मध्यंतरी काही माध्यमांनी दिलं होतं. ही सर्जरी फसल्याचंही बोललं जात होतं. नातेवाईकाचं लग्न उरकल्यानंतरही श्रीदेवी दुबईत थांबण्याचं कारण ही सर्जरी असल्याचंही सांगितलं जात आहे. पुन्हा नाकावर सर्जरी करण्यात येणार होती का? असा प्रश्नही आहे. असं असेल तर या सर्जरीसाठीच्या औषधांनी तर श्रीदेवीचा घात केला नाही ना? अशी शक्यताही उपस्थित केली जातेय. 

आजकालच्या झकपक जगात दिसणं खूप महत्त्वाचं होऊन गेलंय. स्लीम-ट्रीम राहण्यासोबतच शरीर-बांधा सुडौल दिसायला हवा ही अनेकांची अपेक्षा असते. वयोमानानूसार शरीरात बदल होत जातात आणि ते स्वीकारण्याची ताकद अनेकांमध्ये नसते. श्रीदेवी अशांपैकीच एक होती.  सुंदरता हा शाप आहे, असं त्यामुळेच तर म्हणत नसतील ना???