शेतकरी मोर्चा स्पॉन्सर होता? नेमकं काय आहे सत्य???

शेतकरी मोर्चा स्पॉन्सर होता का? अशी विचारणा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियाच चांगलीच व्हायरल होत आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ज्यांच्यावर आरोप आहेत त्या संभाजी भिडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आलीय. हे अकाऊंट संभाजी भिडे स्वतः वापरत नसल्याची माहिती आहे, त्यांचा कोणी समर्थक हे अकाऊंट वापरत असावा मात्र या नावाच्या वलयामुळे ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. हजारो रिट्विट्स आणि लाईक्स आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि रिट्विट्स येत असतील तर हा विषय नक्कीच विचार करायला लावणारा आहे. 

काय आहे ट्विट???

   

तर हे ते ट्विट आहे जे संभाजी भिडेंच्या अकाऊंटवरुन टाकण्यात आलंय. आम्ही शेवटचं तपासलं तेव्हा या ट्विटला 3760 लोकांनी रिट्विट केलं होतं आणि 4765 लोकांनी लाईक केलं होतं. अर्थात त्यांचा या मताला दुजोरा असेल म्हणूनच त्यांनी असं केलं असणार 

30 हजार लोक मोर्चा होते… प्रत्येकाला एक टोपी, एक ध्वज आणि जेवण या हिशोबाने आंदोलनाचा खर्च 1.26 कोटी रुपये आल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आलाय. संभाजी भिडेंच्या एकट्याच्याच अकाऊंवरुन हे ट्विट आलंय असं मानण्याचं काहीच कारण नाही. कारण सोशल मीडिया धुंडाळला तर ही कॉपी पेस्ट पोस्ट असल्याचं तुमच्या सहज लक्षात येईल.

हा विचार नेमका येतो कुठून????

डाव्यांच्या आंदोलनात आंदोलकांना आलं जेवण घरुन आणायला सांगितलं जातं. तसेच काही पैसे जवळ बाळगण्यास सांगितलं जातं. तसेच या आंदोलनातही होतं. आंदोलनात झेंडा होता, मात्र तो काही प्रत्येकाच्या हातात नव्हता. त्यांना झेंडा घेऊन मुंबईला जाऊन कोणती क्रांती करायची नव्हती तर आम्ही मरतोय हे सांगायचं होतं. स्पॉन्सरशिप तिथंच येते जिथं फायदा असतो. इथं तर शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, पण तो समजून कोण घेणार?

शिक्षणाने माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. मात्र खरंच तसं झालं असता तर असे बिनडोक प्रश्न त्याच्या डोक्यात आले असते का? आलेला मेसेज फॉरवर्ड करणे यापुरताच आपला विचार कुंठीत झालाय याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे हा विचार नेमका येतो कुठून? या प्रश्नाचं उत्तर अशाच लोकांना विचारायला हवं.

कई किसानों के तलवे खुल गए थे. घाव हो गया था. (फोटोःफेसबुक)

हा आणि असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे लोक वरील ट्विटला रिट्विट किंवा लाईक करत आहेत, त्यांनीही हे फोटो पाहिले असतील मात्र हे पाहून त्यांच्या काळजाची तार हलली असेल का? कदाचित नसेल हलली. असं झालं असतं तर वरील लॉजिक मांडण्यापूर्वी त्यांनी किमान एकदा तरी विचार केला असता. 

वरील लॉजिक वापरणाऱ्यांना वैयक्तिक उत्तर-

वरील लॉजिक वापरणारा संभाजी भिडे यांच्या विचारांनी प्रेरीत असावा त्यामुळे त्यांना त्यांच्याशी संबंधितच लॉजिक सांगायला हवं. अमोल शिंदे नावाच्या युवकाने फेसबुकवर यासंदर्भात एक लॉजिक मांडलं आहे हे लॉजिक कदाचित त्यांना चांगलं समजू शकेल. 

 

कदाचित काही जण संभाजी भिडे यांना फॉलो करत नसतील किंवा त्यांना वरील लॉजिक पटू शकणार नाही त्यांच्यासाठी सोशल मीडियावर आणखी एक लॉजिक व्हायरल झालंय. ते लॉजिक नुसता विचार करण्याचं नाही तर प्रयोग करण्याचं आहे. 

sahi wala

20 रुपयांचा झेंडा आणि 50 रुपयांची टोपी दिली तर नाशिक ते मुंबई पायी चालाल का? असा सवाल हे लॉजिक करतं. आता तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा. नसेल पडत तर आपल्यात काहीतरी फॉल्ट आहे, डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे हे मनावर घ्यायला हवं. नाहीतर केस हाताबाहेर जाऊ शकते.