“बेटा बेटा होता है, बाप बाप होता है”; असं सेहवाग शोएब अख्तरला का म्हणाला?

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनचे अनेक किस्से फेमस आहेत, मात्र यापैकी सर्वात गाजलेला किस्सा सेहवागने एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सांगितला होता. हा किस्सा ऐकून सचिनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं, मात्र उपस्थितांची हसून हसून पुरेवाट लागली होती. याच कार्यक्रमाला पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकही उपस्थित होता, मात्र हा किस्सा ऐकताना तो धीरगंभीर दिसत होता. 

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यांमध्ये नेहमीच एक प्रकारची चूरस पहायला मिळते. दोन्ही संघाचे फॅन जसे सोशल मीडियावर एकमेकांशी भिडतात, तशाच प्रकारे हे संघ मैदानावरही भिडतात. जिंकण्याचं दडपण दोन्ही संघांवर असतं. अशा सामन्यांमध्ये शेरेबाजी मोठ्या प्रमाणावर होत असते. 

एका टीव्ही कार्यक्रमात शाहरुखने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला मंचावर बोलावलं. त्याला बोलतं करण्याचा शाहरुखने प्रयत्न केला. 

तुमच्या काळात स्लेजिंग होत होतं का?, असा सवाल शाहरुखने सेहवागला विचारला होता.

तुम्हाला वाटतं का मी स्लेजिंग करु शकतो?, असा प्रतिसवाल यावेळी सेहवागने विचारला.

त्यावर शाहरुखने सेहगावला काहीतरी होतच असेल असं म्हणत सचिनसोबत घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ दिला. यावर सेहवागने तो प्रसंग सविस्तरपणे सांगितला. तो असा…

Related image

“एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु होता. सचिन आणि मी फलंदाजी करत होतो. 200च्या आसपास धावसंख्या पोहोचली मात्र मी आऊट व्हायचं नाव घेत नव्हतो. शोएब आमचे चेहरे पाहून कंटाळला असावा. तो बाऊन्सर टाकायचा आणि हूक मारके दिखा, असं म्हणून मला डिवचायचा. माझ्या लक्षात आलं की हा मला भडकावण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरुन मी मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होईल.

मी एकदोन ओव्हर वाट पाहिली मात्र त्याची चिथावणीखोर भाषा थांबण्याची चिन्हं दिसत नव्हती. अखेर मी त्याला सांगितलं, “नॉन स्टाईकर एंडवर तुझा बाप उभा आहे. त्याला हूक मारायला सांग. तो मारुन दाखवेन.”  पुढच्या चेंडूवर त्याने सचिनला बाऊन्सर टाकला. सचिनने त्या चेंडूवर षटकार मारला.

सचिनने मारलेल्या षटकारामुळे मला हुरुप आला. मी शोएबला म्हणालो, “बेटा बेटा होता है और बाप बाप होता है.” 

या कार्यक्रमाचा व्हिडिओ खाली दिला आहे-