…या कारणामुळे मोदींना चीनमध्ये एवढ्या छोट्या कपातून चहा प्यावा लागला!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यासोबत नरेंद्र मोदी चहा पीत आहेत, असं या फोटोत दिसतो मात्र यामुळे नव्हे तर या फोटोतील चहांच्या कपामुळे हा फोटो व्हायरल होतोय. या फोटोत मोदी आणि शी जिनपिंग अत्यंत छोट्या कपातून चहा पिताना दिसत आहेत. यासोबतच या फोटोमध्ये आणखी दोन चीनी मुली दिसत आहेत. 

एवढ्या छोट्या कपात मोदींना चहा का?

चीनमध्ये पाहुण्यांना अशाच प्रकारे छोट्या कपात चहा पाजण्याची परंपरा आहे. त्यामुळे चीनमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याला देखील चीनी लोक अशाच प्रकारे चहा देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील याच परंपरेला अनुसरुन चहा देण्यात आलाय. मोदींसोबत चीनचे राष्ट्राध्यक्षही तशाच प्रकारच्या कपांमध्ये चहा घेत आहेत. आता या कपात चहा नेमका बसतो किती? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

दोन चिनी मुली तिथं काय करत आहेत?

चहा द्यायला त्या मुली तिथं उभ्या आहेत, असा अनेकांचा अंदाज असेल. हा अंदाज चुकीचा नाही, मात्र पूर्णपणे बरोबर देखील नाही. चहा द्यायला उभ्या असलेल्या मुलींच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी आहे. दोन्ही नेते जोपर्यंत चर्चा करत आहेत तोपर्यंत त्यांच्या कपातील चहा संपू द्यायचा नाही. चहा संपला की पुन्हा कपात ओतायचा असं त्यांचं काम आहे. त्यामुळे जोपर्य़ंत चर्चा चालू आहे तोपर्यंत पाहुण्यांना हवा तेवढा चहा पिता येऊ शकतो. कप लहान असले म्हणून काय झालं? पाहुण्यांना चहा कमी पडू नये याची पुरेशी खबरदारी चिनी यजमानांनी घेतलेली दिसतेय.