…म्हणून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आजचा विजय लाखमोलाचा!

मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्ससमोर उभी ठाकली आहे. आजच्या सामन्यात त्यांना कसल्याही परिस्थितीत विजय हवा आहे. कारण आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी ठरली नाही तर त्यांना थेट घरचा रस्ता धरावा लागणार आहे. 

मुंबई इंडियन्स सध्या आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या शेवटच्या स्थानावर आहेत. गतवर्षीच्या विजेत्या असलेल्या या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईच्या चाहत्यांना आपली टीम आयपीएलमध्ये कायम राहावी अशी आशा आहे. 

कोलकाता सध्या चांगल्या रंगात आहे. कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वात त्यांची सध्या चांगली घोडदौड सुरु आहे. मात्र मुंबई इंडियन्स सध्या प्रचंड खराब परिस्थितीतून जात आहे.

आजचा सामना जिंकला तरी मुंबईचं आयपीएलमधील आव्हान जिवंत राहील की नाही सांगता येत नाही. इतर संघ कशी कामगिरी करतात त्यावर मुंबईचा पुढचा मार्ग अवलंबून आहे.