का व्हायरल होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा हा फोटो???

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक लोक हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई एका रिक्षात बसली आहे आणि काही लोक त्यांना या रिक्षातून उतरवत असल्याचं दिसतंय. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना हिराबेन यांचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय. मुलगा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक असलेल्या देशाचा पंतप्रधान असताना त्यांची आई अद्याप रिक्षाने प्रवास करते, असा एक मेसेजही या फोटोसोबत शेअर केला जात आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता हा फोटो व्हायरल करण्यात आल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. 

हिराबेन मोदींचा हा फोटो खरा नसल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. यासंदर्भात पोलखोल करणारे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहे. हिराबेन यांचा हा फोटो एडिटेड फोटो असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. 

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटोतील हिराबेन यांच्या उजव्या दंडाला कुणीतरी धरल्याचं दिसतंय. मात्र संबंधित माणसाच्या हाताचा पंजा दिसत असला तरी तो माणूस आणि त्याचा हात मात्र गायब आहे. त्यामुळे फोटोशॉपमध्ये हा फोटो एडीट करुन त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.