फिफा विश्वचषकाची ब्रँड अॅम्बेसेडर; जगभरात झडतेय हिच्या सौंदर्याची चर्चा

फिफा विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. 14 जूनपासून रशियात सुरु होत असलेल्या स्पर्धेचा ज्वर संपूर्ण जगावर चढण्यास सुरुवात झालीय. रशियात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक सोहळा रंगतोय, त्यामुळे रशिया या स्पर्धेचं आयोजन कशा पद्धतीने करणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. स्वतः राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या सोहळ्याच्या आयोजनावर लक्ष ठेऊन आहेत. जगभरातून लाखो प्रेक्षक सामने पाहण्यासाठी येणार असल्यानं रशिया सरकार संपूर्णपणे सज्ज आहे. 

Image may contain: 1 person, closeup and indoor

सोहळ्याची ख्याती जगभरात पसरावी यासाठी रशियाचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून एका मॉडेलची या विश्वचषकाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आलीय. स्वतः व्लादिमीर पुतीन यांनी यासाठी परवानगी दिल्याचं कळतंय. व्हिक्टोरिया लोपेरेवा असं या मॉडेलचं नाव आहे. व्हिक्टोरिया फक्त मॉडेलच नाही तर ती टीव्ही अँकर, अभिनेत्री आणि ब्लॉगर सुद्धा आहे. मिस रशिया किताबही तीने पटकावला आहे. 

जगभरात सध्या फिफा वर्ल्डकप 2018 ची जोरदार चर्चा आहे, मात्र याच चर्चेएवढी चर्चा आहे व्हिक्टोरियाची… व्हिक्टोरियाच्या आरसपानी सौदर्यानं सारं जग घायाळ झालंय. तिच्या सौदर्यानं फुटबॉल चाहत्यांसोबत इतरांनाही भुरळ पाडली आहे. जगभरात सध्या तिच्या नावाने चर्चा झडत आहेत. तिच्या सौदर्याची स्तुती केली जातेय. 

Image may contain: 1 person, sitting and shoes

व्हिक्टोरियाच्या फेसबुक आणि इन्टाग्रामवर चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस, अशा कमेंट तिला दिल्या जात आहे. शकिराच्या गाण्याच्या लोकप्रियतेसोबत व्हिक्टोरियाच्या सौंदर्याच्या लोकप्रियतेची तुलना केली जात आहे. व्हिक्टोरियाला अॅम्बेसेडर नेमल्यामुळे फुटबॉल विश्वचषकाला फायदाच होणार असल्याचं मानलं जातंय. 

Image may contain: 1 person, smiling, closeup

व्हिक्टोरियाला फिफा विश्वचषकाचं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्यामागे राजकारण असल्याचं मानलं जातंय. रशियाच्या राजकीय वर्तुळात तशी चर्चाही आहे. याचा पुरावा म्हणून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं जातंय. या निवडणुकीत व्हिक्टोरियानं आपल्या 18 लाख इन्स्टाग्राम फॉलोवर्सना पुतीन यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पुतीन यांना याचा फायदा झाला, ते दुसऱ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. 

Image may contain: 1 person, standing

व्हिक्टोरियाचं राजकीय कनेक्शन असलं तरी तिच्या सौदर्याच्या चर्चा झडण्याचं थांबत नाहीये. विश्वचषक जवळ येईल तशा या चर्चा आणखी जोर पकडतील. 

Image may contain: 1 person, smiling, sitting and indoor