अमित शहा मातोश्रीवर आले आणि राजीनाम्यांचे कागद घेऊन गेले!

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. ही भेट सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतंय.

अद्याप दोन्ही पक्षांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, मात्र देशात विरोधक एकवटत असताना शिवसेनेने भाजपला साथ द्यावी, असं आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलंय. शहांच्या या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं उद्धव ठाकरे यांनी कबुल केलंय. 

शहा-उद्धव भेटीनंतर सामनाच्या अग्रलेखातून या विषयावर काहीच भाष्य करण्यात आलं नाही, तसेच इतर सर्व घडामोडी चर्चा चांगली झाल्याचं आणि भविष्यात शिवसेना भाजप युती होऊ शकते याचे संकेत देणाऱ्या आहेत. 

सोशल मीडियावरही हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. बंद दाराआड काय चर्चा झाली यावर अंदाज लावले जात आहेत. चर्चा सकारात्मक झाली असावी, असा या चर्चेचा सूर असल्याचं पहायला मिळतंय. 

दरम्यान, अमित शहा आणि उद्धव ठाकरे भेटीवर सोशल मीडियात जोरदार विनोदांचा पाऊस देखील पडतोय. अमित शहा मातोश्रीवर आले आणि राजीनाम्याचे कागद घेऊन गेले, यासारखे विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शहा-उद्धव भेटीवर विनोद करणारे काही ट्वीट्स-

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वरील ट्वीटमधून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सामनाच्या बातमीचं कात्रण त्यांनी शेअर केलं आहे. 

चर्चा अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात जरी झाली असली तरी लोकांच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुटले नाहीत. अनेकांनी त्यांना लक्ष्य केलेलं पहायला मिळालं. 

अमित शहा उद्धव ठाकरे भेटीवरच नव्हे तर काहीजणांनी अमित शहांनी माधुरी दीक्षित यांच्या घेतलेल्या भेटीवर विनोद केले. 

उद्धव ठाकरे-अमित शहा भेटीवर विनोद करताना ‘राजीनामा’ हा शब्दच महत्त्वाचा दिसला. या शब्दाला धरुनच सर्वाधिक विनोद झाल्याचं पाहायला मिळालं. 

राजीनाम्याच्या कागदांशिवाय अफझल खान या शब्दाभोवतीही अनेक विनोद झाल्याचं पहायला मिळालं. अफझलखानाचा कोथळा काढण्याऐवजी त्याला ढोकळा खायला दिला, असे विनोदही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तुमच्याकडे असे काही विनोद असतील आणि ते या रिपोर्टमध्ये आले नसतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये ते विनोद नक्की टाका, जेणेकरुन असे विनोद वाचण्याची इच्छा असणाऱ्यांना ते वाचता येतील.