खोटारडेपणापेक्षा अॅरोगन्स बरा….. संग्राम देशमुख यांचा ब्लॉग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधीला जे प्रतिउत्तर दिलं त्यात त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा arrogant असं संबोधलं… आणि नेहमी प्रमाणे त्याच्या प्रश्नांना सरळ उत्तरं देण्यापेक्षा नेहमीची डायलॉगबाजी केली…. त्याला त्याच्या परिवाराला पक्षाला टार्गेट केलं….

राहुल गांधी या माणसाचा मला २००९-२०१४ या काळात प्रचंड राग होता…. भाजपने ज्या पद्धतीने सोशल मीडिया वापरून त्याचं चरित्रहनन केलं त्यामुळे नाही तर त्याच्यात जो arrogance होता त्यामुळे, खरं तर हा arrogance संपुर्ण कॉंग्रेसमध्येच़ वाढला होता आणि राहुल त्याचं प्रतिनिधित्व करत होता… मनमोहनसिंग यांच्या cabinet ने घेतलेल्या निर्णयाची प्रत प्रेस कॉन्फरन्स मध्ये फाडणे हा त्या arrogance चा अत्युच्च बिंदू होता…..

तर मी यांना क्लोज़ फॉलो करायला लागलो ते अलीकडे झालेल्या गुजरात निवडणुकांपासून, याआधी झालेल्या इतर निवडणुकांमध्ये बहुतेक वेळा यांना humiliating हार पत्करावी लागली होती त्यामुळे आता भाजपच्या बालेकिल्ल्यात हा कशी लढत देतो ही उत्सुकता होती..

गुजरात मध्ये आयुष्यात पहिल्यांदा राहुल गांधीने आपला arrogance योग्य पद्धतीने वापरला……आणि आता तर त्याच्या याच arrogance ने मोदी सारख्या बलाड्य प्रतिस्पर्ध्याला घाम फुटत आहे….

त्याने काल भाषणात जे काही मुद्दे मांडले ते याआधीसुद्धा वेगवेगळ्या व्यासपीठावर त्याने मांडले आहेत पण काल मोदींसमोर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तो फटके देत होता….

त्यामुळे मोदींनी आपल्या भाषणात त्याच्या या arrogance वर जे प्रहार केले त्याला काहीच अर्थ नाहीये कारण सध्या तो arrogance योग्य पद्धतीने वापरतो आहे….

याउलट मला जास्त आक्षेप आहे तो मोदींच्या खोटारडेपणा आणि पंतप्रधानासारख्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्यावर प्रचंड विश्वास टाकलेल्या जनतेला फसवण्याच्या व्रुत्ती़ला….

राहुलच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी थेट उत्तरं न देता दिशाभूल केली, इथे फक्त दोनच़ उदाहरणं देतो….

१. रफायेल डील

याबद्दल राहुल चे दोन प्रमुख आरोप आहेत, एक म्हणजे विमानाची किंमत ५०० कोटीची १६०० कोटी कशी झाली ? आणि दुसरं म्हणजे हा कॉन्ट्रेक्ट आपल्या एचएएल ला न मिळता मोदींचे मित्र ज्यांनी कधी आयुष्यात विमानं बनवली नाही त्या अनिल अंबानींच्या कंपनीला कसा मिळाला ? याबद्दल आपण डिफेन्स मिनिस्टरला प्रश्न विचारला असता त्यांनी फ्रांस आणि भारतामध्ये एक गोष्टी डिस्क्लोज न करण्याचा करार आहे असं उत्तर देऊन या दोन प्रश्नाची उत्तर दिली नाहीत….. राहुल गांधी यांनी आपण फ्रांसमध्ये असतांना फ्रांसच्या राष्ट्रपतींना याबद्दल विचारलं असता असा कोणताच करार नाही असं कळलं….

आता या आरोपांना उत्तर देतांना मोदींनी या दोन प्रश्नांकडे दुर्लक्ष करत फक्त देशाच्या सुरक्षेसंदर्भात असे आरोप चुकीचे आहेत वगैरे वगैरे मांडणी केली आणि ५००चे १६०० कसे आणि अनिल अंबानीला का ? हे प्रश्न अनुत्तरितच़ राहिले…..

२. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार

हे आश्वासन मोदींनीच़ आपल्या प्रचारसभांमध्ये दिलं होतं, राहुल गांधींनी एका सरकारच्याच़ रिपोर्टचा आधार घेत एका वर्षात फक्त ४ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्यात असं सांगितलं…

आता या आरोपाला मोदींनी जे उत्तर दिलंय ते विश्वास ठेवण्यासारखं नाहीच उलट चीड आणणारं आहे….

उत्तरात त्यांनी एक गणित सांगितलं की मागच्या वर्षात इतके इतके डॉक्टर, सीए, इंजिनियर इत्यादी झालेत त्यांच्यापैकी अमुक टक्के लोकांनी जर स्वतःच्या व्यवसाय सुरू असेल (जर तर ची भाषा ?) आणि त्यांच्याकडे प्रत्येकी इतकी लोकं असतील तर इतक्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या….. आणि हे गणित समजवून सांगत त्यांनी आकडा एक कोटीच्या वर नेला….

या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे नोकऱ्या मिळाल्या असतील तरी त्यात सरकारच़ काय योगदान ? काय संबंध ?

सरकारकडून रोजगार उपलब्ध करून द्यायचे हे आश्वासनं असतात त्याचा अर्थ म्हणजे सरकार वेगवेगळ्या स्वरूपाचे नवीन प्रकल्प सुरू करणार किंवा बाहेरून इनवेस्टमेंट आणणार आणि नवीन रोजगार उपलब्ध करून देणार… यासाठी मोदींनी प्रचंड परदेश वाऱ्या केल्या, मेक ईन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारखे घाट घातले पण यातुन किती इनवेस्टमेंट आली आणि किती नवीन रोजगार (सरकारच्या माध्यमातून) उपलब्ध झाले ? याच उत्तर सध्या कुठेही नाहीये…. सरकार जाहिरातींमधुन फक्त आकडेवारी फेकतेय पण जमिनीवर हे चित्र कुठेच नाही…..मोदींच्या भाषणातील हा प्रसंग सर्वांनी आवर्जून पहावा…

हे सर्व बघून मोदींना इतकंच सांगावंस वाटतं की ज्या arrogance साठी राहुलला बदनाम करत आहात तो एक वेळ देशाला चालेल पण खोटारडेपणा नको…..

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल एक वजनदार वाक्य बोलून गेलाय ते नक्की ऐका….. तो म्हणाला “Modiji and Amit Shah can’t afford to lose” त्यांना माहिती आहे की ते जर हरले तर त्यांच्या विरुध्द असलेल्या त्यांनी दाबलेल्या केसेस पुन्हा ओपन होतील (जसं जस्टिस लोया)….. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळायला हवी या व्रुत्तीच़ खरं कारण राहुलने एका वाक्यात स्पष्ट करून टाकलं..

लेखक- संग्राम देशमुख ( लेखक ‘एज्यकेट टू ऑटोमेट’चे संचालक आहेत )