पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे

-लाल किल्ल्यावरच्या भाषणात पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवीरांचा गौरव. चंद्रपूरमधल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी फत्ते केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचा उल्लेख. या आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली

-पुढील वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या नरसंहारात शहीद झालेल्या प्रत्येक नागरिकाला विनम्र श्रद्धांजली

-भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: नरेंद्र मोदी

-2014 मध्ये देशाने केवळ सरकार बनवलं नाही तर देशवासियांनी देश बनवण्यात सहभाग घेतला

-काँग्रेस सरकारच्या गतीनं काम सुरु असतं तर अनेक प्रकल्प रखडले असते

-2013 पर्यंत जे काम झालं त्याची गेल्या चार वर्षातल्या कामाची तुलना केली तर देश किती वेगाने प्रयत्न करतोय हे कळेल

-2014 ला मतदारांनी केवळ सरकार बनवलं नाही. तर ते देश बनवण्यासाठी एकत्र आले आणि एकत्र येत राहतील

-2013 मध्ये देशात विकासाचा जो वेग होता तो गेल्या चार वर्षात वाढला आहे… शौचालय, वीज पुरवठा अशा सुविधा देण्यासाठी 2013च्या वेगाने काम केल असतं तर काही दशक लागली असती पण आता वेग वाढला

-013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती

-गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या

-गावागावात शेतकऱ्यांकडून रेकॉर्ड ब्रेक ट्रॅक्टर्सची खरेदी

-सर्जिकल स्ट्राइकने देशाच्या दुष्मनांना धडा शिकवला

-बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक, गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला

-आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे

-आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला

-एसटी लागू करून व्यापाऱ्यांमध्ये विश्वास जागृत केला

-वन रँक वन पेन्शनचा निर्णय रखडला होता, तो आम्ही मार्गस्थ केला

-करण्याची इच्छा असेल तर कोणतही काम अशक्य नाही

-13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे

-लाल किल्ल्यावरून देशाला एक खुशखबर सांगायची आहे. 2022 ला स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून कुणीही भारतीय अंतराळाची सफर करू शकेल

-अंतराळामध्ये मानवयान पाठवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल

-शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दीडपट वाढवलं आहे

-बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय

-जगात भारताचा दबदबा निर्माण करायचा आहे

-खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला

-भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र बनला आहे

-स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळालं

-कठोर निर्णय घेण्याची हिम्मत आम्ही दाखवली कारण देश आमच्यासोबत आहे

-आमच्या स्वच्छ भारत अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवली, पण WHO च्या अहवालात याच अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचल्याचं नमूद

-गांधीजींनी सत्याग्रही तयार केले, त्यांच्या आगामी जयंतीदिनी आपण देशाला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छाग्रही बनवू

-एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत गरीबीरेषेतून वर आलेत-

-येत्या 25 सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाखांचा विमा

-प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य

-कुणाचं पोट भरल्यानंतर मिळणारं पुण्य मोठं असतं, हे पुण्य देशातील प्रामाणिक करदाते कमावत आहेत

-2013 पर्यंत 4 कोटी नागरिक टॅक्स भरत होते, आता ती संख्या पावणे सात कोटीवर पोहोचली आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही ‘भाई-भतीजा’वाद संपवला

– देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती, आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान

-बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्थेकडून सुरू

-तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच

-न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से…