अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानींचे कधीही न ऐकलेले 5 भन्नाट किस्से

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप नेते, वाजपेयींचे दीर्घकाळाचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी मुलाखती दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काही किस्से सांगितलं होते. आम्ही ते किस्से तुम्हाला सांगणार आहोत.

1952 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. 1953 मध्ये पक्षाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन होतं. तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून अडवाणी राजस्थानातून आले होते. तेव्हा अडवाणींनी पहिल्यांदाच वाजपेयींना पाहिलं होतं. पहिल्यांदा त्यांचे भाषणही एेकलं होतं.

एकदा अटल बिहारी वाजपेयी राजस्थानमध्ये आले होते. तेव्हा पक्षाने मला त्यांच्यासोबत राहण्याची जबाबदारी दिली. तेव्हा त्यांच्या सहवासात माझ्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव पडला. तो प्रभाव मी आजपर्यंत विसरलो नाही, असं अडवाणी सांगतात.

अटल बिहारी वाजपेयींमुळे माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. मला मी पक्षात टिकू शकणार नाही असं मला वाटू लागलं होतं. कारण ज्या पक्षात इतके योग्य नेतृत्व आहे. त्या पक्षात माझ्यासारखा कॅथलिक शाळेत शिकलेला. ज्याला नीट हिंदी पण बोलता येत नाही. तो काय आणि कसे काम करणार?, असं मला वाटू लागलं होतं. मला 1957 पर्यंत भाषण करता येत नव्हतं आणि ते कठीण गोष्टही सोपी करून सांगत असत, असं अडवाणींनी सांगितलं.

दिल्लीत नायबांसची पोटनिवडणूक होती. आम्ही खुप मेहनत करूनही हारलो होतो. त्यामुळे आम्ही दोघे उदास होतो. तेव्हा वाजपेयींनी चित्रपट पाहण्याची ऑफर दिली. अजमेरी गेटवर आमचे कार्यालय होते. जवळच पहाडगंड थिएटर होते. तेथे गेलो. तेव्हा तिथं राज कपूरचा “फिर सुबह होगी” हा चित्रपट लागला होता. “आज आपण हरलो आहोत. परंतु तुम्ही बघाच नक्कीच सकाळ होईल”, असं मी वाजपेयींना म्हटलो.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 1957मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. भाजप नेते जगदीश प्रसाद माथूर – अटल बिहारी वाजपेयी हे दोघे एकत्र चांदणी चौकात राहत होते. ते रोज संसदेत चालतच जायचे आणि चालतच यायचे. जवळपास 6 महिन्यांनी वाजपेयींनी रिक्षाने जाण्याचा आग्रह धरला. तेव्हा यांच्या या गोष्टीचे माथूर यांना नवल वाटलं. खासदार म्हणून सहा महिन्यांचे वेतन त्यांना एकत्र मिळाले होते. रिक्षाने जाणे म्हणजे आमच्यासाठी मौजमस्ती होती… असं त्यांनी म्हटलं होतं.

मला विश्वास वाटतो की पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत आमचा पक्ष विजयी होईल. आमचे पंतप्रधान वाजपेयी होतील, अशी घोषणा 1995 मध्ये मुंबईच्या सभेत अडवाणींनी केली होती. तेव्हा वाजपेयी तिथंच उपस्थित होते. तुम्ही काय घोषणा केलीत. मला विचारलंही नाही., असं वाजपेयी त्यांना म्हटले. पक्षाध्यक्ष नात्याने माझा तुमच्यावर तेवढा अधिकार आहे, असं अडवाणींनी त्यांना उत्तर दिलं.