मोदी स्मशानभूमीत असताना आला अटल बिहारींचा फोन, वाचा नेमका काय आहे किस्सा…

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. शिवाय या दोघांचे किस्सेही तसे प्रसिद्ध आहेत. या दोघांचा एक नाट्यमय प्रसंग नरेंद्र मोदींनी सांगितला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मोदींवर टाकायची होती. तेव्हा एक नाट्यमय प्रसंग घडला होता. जेव्हा त्यांनी मोदींवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते पंतप्रधान पदाची धुरा संभाळत होते.

एक दिवस त्यांनी मोदींना फोन केला. मोदींना कुठे आहात? असं विचारले. तेव्हा मोदी माधवराव सिंधिया यांच्यासोबत हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले पत्रकार गोपाल यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी होते.

वाजपेयी यांनी विचारपुस करताच, मी स्मशानात आहे, असं उत्तर मोदींनी दिलं. त्यावेळी वाजपेयींना कदाचित कसं बोलू काय बोलू असं वाटलं असावं म्हणून ते शांत झाले. ‘आता मी काय बोलू’, असं वाजपेयींनी हसतच म्हटलं. ते फोन ठेवण्याच्या तयारीत होते. तेव्हा मोदींनी त्यांना हटकलं. तुम्ही फोन केला म्हणजे नक्कीच काही महत्तवाचे काम असेल, असं मोदींनी त्यांना विचारलं.

स्मशानात का गेला आहेस?, त्यासोबत कधीपर्यंत परत येणार आहे?, असं अटल बिहारी वाजपेयींनी मोदींना विचारलं होतं. असा गमतीशीर किस्सा मोदींनी स्वतः एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

नरेंद्र मोदींच्या जीवनावर अटल बिहारी वाजपेयींचा अधिक प्रभाव होता. मोदींसाठी वाजपेयी हे फक्त नेते किंवा राजकारणात मार्गदर्शक नव्हते. तर वाजपेयी हे मोदींसाठी वडिलांच्या जागेवर होते. त्यांच्या नात्यात आदरभावना होती.