अटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण कारकीर्द तुम्हाला माहित आहे का?

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली झाला होता. त्यांंनी आयुष्यात आमदार, खासदार, पक्षाचे अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री अशी अनेक पदं भुषवली आहेत.

राजकारणात पहिलं पाऊल-

1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने त्यांचा राजकारणाशी पहिला संबध आला. या काळात त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी आणि भारतीय जनसंघ पक्ष (सध्याचे नाव ‘भाजप’ ) यांच्या संपर्कात आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

सदस्य, संस्थापक, अध्यक्ष-

अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. 1955 ते 1977 मध्ये वाजपेयी जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते होते. त्यानंतर 1967-1973 या काळात ते भाजपच्या अध्यक्ष पदावर होते. 

विरोधी पक्षनेते, परराष्ट्रमंत्री, खासदार-

11व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते, त्यासोबतच 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 दरम्यान त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पदही भूषवलं आहे. 1991- 2009 या काळात ते भाजपचे लखनऊमधून खासदार होते. 

पंतप्रधान –

पंतप्रधानपदी पहिली निवड –

1996 च्या निवडणुकात भाजप 162 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा न मिळाल्याने भाजप सरकार कोसळलं. बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसात राजीनामा दिला होता.

दुसऱ्यांदा पंतप्रधान –

12 व्या लोकसभेत 19 मार्च 1998 मध्ये वर्षभरासाठी ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांनी एका वर्षात पंतप्रधानपदावर आपली ठळक छाप सोडली. या काळात त्यांनी जमिनीखाली 5 अणुचाचण्या केल्या. वर्षाच्या शेवटी पाकिस्तानसोबत शांततेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. याच वर्षात झालेल्या कारगिल युद्धात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कणखर पंतप्रधान म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

कारगिल युद्धानंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाताना ‘खेल तो जीतो और दिल भी जीतो’, असा संदेश त्यांनी भारतीय संघाला दिला होता. 

तिसऱ्यांदा पंतप्रधान-

अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.ऑक्टोबर 1999 ते मे 2004 या काळात ते पुर्णवेळ भारताचे पंतप्रधान होते.