#EXCLUSIVE | अटल बिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन LIVE

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. सध्या त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी अटलजींवर राजघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

अटल बिहारींवर गेल्या 9 आठवड्यांपासून नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्र सरकारने 7 आठवड्यांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

सध्या भाजप मुख्यालयात अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली. अनेक कार्यकर्ते आपल्या आवडत्या नेत्याचं भरल्या डोळ्यांनी अंत्यदर्शन घेत आहेत. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. 

पाहा लाईव्ह व्हीडिओ-