पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच 15 लाख रुपये पगारावाली मेकअप आर्टिस्ट नेमलीय का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राहणीमानाची देशभरात चांगलीच चर्चा असते. मोदी जॅकेट असो, कुर्ती असो की त्यांनी स्वातंत्र्यदिनाला घातलेला फेटा असो… आपल्या पेहरावामुळे मोदी नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असं पूर्ण नाव लिहिलेल्या त्यांची सूटची देखील चांगलीच चर्चा झाली होती. चिरतरुण राहण्यासाठी मोदी एक विशिष्ट प्रकारचं महागडं मशरुम खात असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आपल्या दौऱ्यांदरम्यान मोदी पेहराव बदलतात याचीही चांगलीच चर्चा रंगली होती, मात्र या सर्व चर्चांना पुरुन उरेल अशी एक चर्चा सध्या सोशल मीडियात सुरु आहे. नरेंद्र मोदींनी मेकअप करण्यासाठी एक महिला ठेवली आहे आणि तिच्या पगाराच्या आकड्याची चर्चा सध्या चांगलीच चघळली जात आहे. 

नेमकी काय चर्चा सुरु आहे?

एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. एक तरुणी नरेंद्र मोदींचा मेकअप करत असल्याचं या फोटोत दिसत आहे. तरुणीच्या हातात एक बॉक्स असून तो मेकअप बॉक्ससारखाच दिसत आहे. ‘काँग्रेस लाओ, देश बचाओ’ नावाच्या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलेला मजकूर महत्त्वाचा आहे.

“15 लाख रुपये महिला पगार असलेल्या महिलेल्या हातून नटून-थटून रडण्यासाठी बाहेर पडण्यास तयार असलेले नौटंकीबाज”, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. या पोस्टला 1900 लोकांनी लाईक केलं असून 4744 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

मोदींच्या 15 लाख रुपयांच्या मेकअप आर्टिस्टबद्दल सोशल मीडियात करण्यात आलेली ही एकमेक पोस्ट नाही. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईट्सवर अशा पोस्ट ढिगाने आढळतील. मात्र मूळ मुद्दा हा आहे की ही पोस्ट खरी आहे का?

यहां से तो तकरीबन 13 हजार लोगों ने इस पोस्ट को शेयर किया है.

सोशल मीडियातील दावा खरा आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या दाव्यासोबत व्हायरल होणारा फोटो कुठला आहे? हे तपासलं तर हा फोटो एका व्हीडिओतून घेतल्याचं समोर येतं. 19 मे 2016 रोजी मादाम तुसाद सिंगापूर नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हीडिओ टाकण्यात आलेला आहे. या व्हीडिओच्या 0.16 व्या मिनिटाला व्हायरल फोटोची फ्रेम पहायला मिळते. हा व्हीडिओ नीट पाहिला तर कल्पना येते की हा व्हीडिओ नरेंद्र मोदींच्या मेणाच्या पुतळ्यासंदर्भात आहे. यामध्ये जी तरुणी दिसतेय ती मादाम तुसाद संग्रहालयाची एक्सपर्ट आहे. मोदींचा मेणाचा पुतळा बनवण्याआधी त्यांची मापं घेण्यासाठी एक टीम आली होती. त्यामध्ये ही तरुणी होती.

वरील माहिती आपल्याला खोटी वाटत असेल तर आम्ही खाली एक व्हीडिओ देत आहोत तो व्हीडिओ पाहा-

व्हायरल फोटोमध्ये दाखवण्यात आलेली तरुणी मादास तुसाद संग्रहालयाची एक्सपर्ट आहे. याचाच अर्थ ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेकअप आर्टिस्ट नाही. त्यामुळे संबंधित व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खरा नाही.