मोदी सरकारची नवी योजना; घरबसल्या 75 हजार रुपये कमावण्याची संधी

2014 साली तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. असं झालं तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असा दावा त्यांनी केला होता. मोदींचं नशिब एवढं चांगलं की भाजपला बहुमताचा जादूई आकडा पार करता आला. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. काळा पैसा भारतात आणण्यासाठी सरकारने काही प्रयत्न केले. नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेतला मात्र काळा पैसा काही बाहेर आला नाही. नोटाबंदी फेल गेल्याचा आरोप मोदींवर होत आहे. कोणत्याही भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा झाले नाहीत, मात्र आता मोदी सरकार सरकारने एक योजना आणली आहे. त्याद्वारे घरबसल्या 75 हजार रुपये कमवता येऊ शकतात.

नक्की काय आहे ही योजना?

यूनियन पब्लिक सर्विस कमिशनने अर्थात यूपीएससीने ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला घरबसल्या फक्त एक लोगो बनवायचा आहे. हा लोगो जर सर्वात चांगला असेल तर मोदी सरकार तुम्हाला 75 हजार रुपये देईल. यूपीएससीने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एखाद्या डेव्हलपर्सला लोगो बनवायला देण्याऐवजी त्यांनी लोकांना ही संधी दिली आहे. त्यासाठी या योजनेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मोदी सरकार देगी आपको 75 हजार रुपये, घर बैठे कर दीजिए ये काम

कधीपर्यंत आहे मुदत?-

तुम्हाला जर या योजनेत भाग घ्यायचा असेल यूपीएससीचा लोगो तुम्ही बनवणार असाल तर तुमच्याकडे 11 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ आहे. सहभागासोबतच तुम्हाला या लोगोचा तपशील सुद्धा द्यावा लागणार आहे. हा लोगो कसा आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो यूपीएससीचा लोगो म्हणून सर्वात चांगला कसा आहे हे तुम्हाला या सहभागासोबत लिहून द्यायचं आहे. अर्थात तुमचा लोगो निवडला जाण्यासाठी तुमच्या लोगोच्या डिझाईनसोबतच हा तपशील व्यवस्थित असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. 

मोदी सरकार देगी आपको 75 हजार रुपये, घर बैठे कर दीजिए ये काम

कुठे आणि कसा नोंदवाल सहभाग?-

यूपीएससीच्या या योजनेत सहभागी होण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे, तीचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे mygov.in या सरकारी वेबसाईटवर तुमची प्रोफाईल अप टू डेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर असं नसेल तर तुमचा या योजनेसाठीचा प्रवेश स्वीकारला जाणार नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.upsc.gov.in या यूपीएसचीच्या वेबसाईटवर जाऊ शकता. त्यानंतरही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही anilkumar-upsc@gov.in या मेल आयडीवर मेल करुन तुमची शंका विचारु शकता. याशिवाय फोन करण्याचा पर्याय देखील यूपीएससीने उपलब्ध करुन दिला आहे. 011-23382415 हा तो फोन नंबर आहे ज्यावर तुम्ही फोन करु शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता.