मराठ्यांनो, कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करु नका!

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली होती, मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना विहित नमुन्यात अर्ज देखील पाठवला होता. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिले आमदार ठरले होते. मधल्या काळात हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा लढा राजकीय मार्गाने लढण्यासाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षांची स्थापना केली. मात्र अधिवेशन सुरु नसल्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता, त्यामुळे त्यांनी हा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात देण्यात आलेली आहे. शिवराज्य बहुजन पक्ष या पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात देण्यात आली आहे.

जाधव यांचा विहित नमुन्यात केलेला राजीनाम्याचा अर्ज-

Image result for Harshwardhan Jadhav Resign
विहित नमुन्यात केलेला राजीनाम्याचा अर्ज

राजकीय टायमिंग साधण्याचा प्रयत्न-

मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नुकताच सरकारला मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरच मराठा आरक्षण मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर हर्षवर्धन जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. फक्त राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरला जात आहे, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. 

माझा राजीनामा त्वरित मंजूर करा-

मराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचं कर्तव्य तुमच्या हातात होती, त्यामध्ये तुम्ही दिरंगाई केली आहे. त्यामुळे बरीच कोवळी मुलं आत्महत्येकडे वळली. या कारणामुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर तसेच मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो, असं हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. 

कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करु नका-

मराठा समाजालासुद्धा या जाहिरातीच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी एक विनंती केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने अजिबात हुरळून जाऊ नये. अजून लोकसभेत बिल पास व्हायचं आहे. आपल्याला या लढ्यात काही प्रमाणात यश मिळालं आहे, त्याची किंमत याआधीच आपण चुकवलेली आहे. तथापि आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचे काम कुठल्याही मराठ्याने करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन जाधव यांची जाहिरात जशीच्या तशी-  

वाचायलाच हवं असं काही-

-मोदी सरकारची नवी योजना; घरबसल्या 75 हजार रुपये कमावण्याची संधी

-तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये हिंदी गाणी आहेत का? …तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा

-माणसांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर…

-आता गुन्हेगारांची खैर नाही; पुणे ग्रामीण पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्यांची एन्ट्री