जावा 42 की रॉयल एनफिल्ड 350?; नेमकी कोणती गाडी आहे खास???

आनंद महिंद्रा यांनी जुनी जावा मोटरसायकल पुन्हा एकदा बाजारात आणली आहे. जावाच्या 3 मोटरसायकल बाजारात उतरण्यात आल्या आहेत. पहिल्याच इम्प्रेशनमध्ये या गाडीच्या लूक्सने अनेक भारतीयांची मनं जिंकली आहेत. जावा मोटरसायकल खरेदी करण्याची अनेकांची इच्छा आहे. जावाच्या आगमनामुळे रॉयल एनफिल्डच्या बुलेटला सरळ सरळ स्पर्धा निर्माण झाली आहे. सध्या गाडीप्रेमींमध्ये बुलेटची प्रचंड क्रेझ आहे, मात्र जावाच्या आगमनामुळे या क्रेझला धक्का बसू शकतो. अनेक बुलेटप्रेमी किंवा नव्याने बुलेटसारखी गाडी घेणारे जावाकडे वळू शकतात. जावा भारतात लाँच झाली असली तरी खऱ्या बुलेटप्रेमींची संख्या काही कमी नाही. असं असलं तरी कोणती गाडी खास आहे, हे त्यांची तुलना केल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे खाली या दोन्ही गाड्यांची वैशिष्ट्ये देत आहोत-

कशी आहेत दोन्ही गाड्यांची इंजिन्स-

jawa & jawa 42

जावा कंपनीच्या 42 मध्ये 293 सीसीचं लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. जे 27 एचपी पावर आणि 28 एनएमचा टॉर्क जनरेट करतं.  या गाडीचं इंजिन 6-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशनने लैस आहे।

तर बुलेट क्लासिक 350 मध्ये 346 सीसीचं एयरकूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. जे 19.8 बीएचपी पावर आणि 28 एनएमचा टॉर्क जनरेट करतं. क्लासिकचं इंजिन 5-स्पीड गियरबॉक्सनं लैस केलेलं आहे. 

इंधन टाक्या आणि गाडीचं वजन-

नवीन जावा 42 च्या इंधन टाकीमध्ये 14 लीटर इंधन बसतं. तर बुलेटच्या इंधन टाकीमध्ये 13.5 लीटर इंधन बसतं. अशा गाड्यांमध्ये गाडीचं वजन हा आणखी एक विचारात घेतला जाणारा मुद्दा असतो. जर गाडीच्या वजनाचा विचार केला बुलेट 350 ही जावापेक्षा 13 किलो जड आहे. बुलेटचं वजन 183 किलो आहे तर जावा 42 चं वजन 170 किलो आहे. चाकांच्या आकाराचा विचार केला तर जावा 42 चा व्हीलबेस 1,369 एमएम आणि बुलेटचाचा व्हीलबेस 1370 एमएमचा आहे. 
Royal Enfield Classic 350

डिस्क ब्रेक आणि इतर गोष्टी-

जावाच्या गाडीमध्ये 280 एमएम का डिस्क ब्रेक आणि रियरला 153 एमएम ड्रम ब्रेक सेट-अप लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे क्लासिक 350 बुलेटमध्ये फ्रंट और रियर दोन्ही बाजूला जावा प्रमाणे ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे.  आगामी काळात रॉयल एनफिल्ड आपल्या सर्व गाड्यांमध्ये एबीएस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यावर सध्या काम सुरु आहे. 

आठवणीतील जावाची क्रेझ- 

jawa motorcycle
रॉयल एनफिल्डचा लूक्स क्लासिक म्हणूनच ओळखला जायचा. बुलेटला टफ देईल असे ब्रँड खूप आहेत पण त्यांना पाहिजे तेवढी टफ देता आली नाही. 1960 साली स्थापन झालेल्या जावा मोटरसायकलची एकेकाळी भारतात क्रेझ होती. तिच्या लूक्सवर अनेक भारतीय फिदा होते. मात्र 90 च्या दशकात विदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत घुसखोरी केली आणि जावाला उतरती कळा लागली. काळानूसार बदल न केल्याने 1996 साली या कंपनीला टाळं लागलं. असं असलं तरी लहानपणी जावा पाहिलेली पिढी आता तरुण झाली आहे. तिच्या जावाबद्दलच्या आठवणी आहेत. जावाने आपलं तेच जुनं मॉडेल सादर केलं आहे, सोबतच आणखी दोन आकर्षक मॉडेल्स आणली आहेत. या गाड्यांचा लूक जबरदस्त आहे. 

दोन्ही गाड्यांच्या किंमतीत काय फरक?

गाडी खरेदी करताना तिचं दिसणं, तिच्यातील फीचर्ससोबतच तिच्या किंमतीचाही विचार केला जातो. जावा लाँच होताच अनेकांना तिची भूरळ पडली. मात्र तिची किंमत जाणून घेण्याचीही उत्सुकता होती. जावा 42 चा विचार केला तर या गाडीची किंमत 1 लाख 55 हजार रुपये आहे. तिची प्रतिस्पर्धी असलेल्या बुलेटची किंमत 1 लाख 51 हजार रुपये आहे. शहरांनूसार या किंमती एक दोन हजारांनी कमी जास्त होऊ शकतात.